मराठी भाषा नातेसंबंधांला बांधून ठेवते- सुरेखा कामुले
बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात मराठीचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि श्रेष्ठ साहित्यकार वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला ग्रंथपाल सुरेखा कामुले हे प्रमुख अतिथी आणि वक्ता म्हणून उपस्थित होते, तर अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर यांनी भूषवले होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ ईशस्तवनाने झाल्यानंतर मराठी विभागाच्या प्राध्यापिका डॉ.आरती जाधव यांनी कार्यक्रमा विषयी प्रास्ताविक केले. डॉ. डी. एम. मुल्ला यांनी अतिथींचा परिचय करून उपस्थितांचे स्वागत केले. प्रमुख अतिथी स्थानावरून बोलताना ग्रंथपाल सुरेखा कामुले म्हणाले, मराठी भाषा मातृभाषेच्या रुपाने हृदयातून निघून आजूबाजूच्या परिसरात आपले सुंदर, गोड आणि अमिट असे स्थान निर्माण करीत असते. आजच्या तंत्रज्ञान युगा मुळे नाते संबंधात शिथिलता आली आहे.परंतु मातृभाषा आणि मराठी साहित्य नाते संबंधाला बांधून ठेऊन आहे. मराठी साहित्यातुन आम्हा सर्वाना समकालीन जीवन यथार्थांची जाणीव होते. सुरेखा कामुले यांनी यावेळी वि.वा. शिरवाडकर यांच्या साहित्याचा उलगडला केला.
अध्यक्षांवरून बोलताना प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर म्हणाले की, नवीन शिक्षण पध्दतीच्या माध्यमातून सरकार प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून केल्यामुळे या भाषेतुन आपल्या पाठ्यक्रमाला लावलेल्या शिक्षणाला सुगमरित्या समजून घेता येते. वि.वा. शिरवाडकर यांच्यामुळे मराठी भाषा आणि साहित्याला विश्व साहित्या मध्ये एक उंच शिखर गाठता आले.
यावेळी दिया पाटील, प्रियंका नलवडे, गौतमी हलगेकर, संगीता तारीहाळकर, हर्षल धामणेकर,साक्षी घुंगटकर, श्रुतिका पाटील आदिनी विद्यार्थ्यांनी मराठी गीतांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाला अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी प्रा. जगदीश येळ्ळुर यांनी सर्वांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागाच्या प्राध्यापिका डॉ.वृषाली कदम यांनी केले.