मराठा मंडळ पदवी महाविद्यालयात शेअर बाजार बद्दल चर्चासत्र
बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे ‘शेअर बाजारची मूलभूत माहिती’ बद्दल चर्चासत्र आयोजित करण्यात आले.यावेळी प्रमुख वक्ता म्हणून एंजल ब्रोकर कंपनीच्या बेळगांव विभागाच्या व्यवस्थापक ज्योती नायडू उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान नँक समन्वय अधिकारी प्रा.आर.एम. तेली यांनी भूषविले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा.भाग्यश्री चौगले यांनी प्रास्ताविक करुन सर्व उपस्थितांचे स्वागत केले. तद्नंतर ज्योती नायडू आणि सविस्तर शेअर बाजाराबद्दलची मूलभूत माहिती देताना शेअर बाजार ची सुरुवात, त्याचा विकास, त्यामध्ये गुंतवणूक कशी करावी, येणारे धोके आणि धैर्य कसे दाखवावे आधी बद्दल माहिती सर्व विद्यार्थ्यांच्या समोर प्रस्तुत केली.
यावेळी बोलताना वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.एच.जे. मोळेराखी म्हणाले की, शेअर बाजार मध्ये गुंतवणूक केल्यामुळे आज अनेक कंपन्या उत्तमरीत्या चालतात, चांगल्या कंपन्या आणि उत्तम उत्पादनामुळेच अनेक नोकऱ्यांची निर्मिती होऊन बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळतात.
कार्यक्रमाच्या शेवटी गौतमी कडोलकर यानी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाला डॉ. डी. एम. मुल्ला, प्रा.अर्चना भोसले प्रा. जगदीश येळ्ळुर, प्रा. विठ्ठल कदम आणि अनेक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री चौगले यांनी केले.