मराठी राज्यभाषा दिन साजरा
श्री कालिकादेवी युवक मंडळ बापट गल्लीच्या वतीने मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी गल्लीतील जेष्ठ कार्यकर्ते महेश पावले यांच्या हस्ते ग्रंथाचे पूजन करण्यात आले. दीप प्रजवलन अतुल केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महेश पावले यांनी मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच आपल्या दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा आग्रही वापर करावा असे आवाहन करण्यात आले. नंतर मिठाई वाटप करण्यात आली.
यावेळी गल्लीतील सुनील मुरकुटे, सुनील केसरकर, महादेव केसरकर, भाऊ किल्लेकर, गजानन निलजकर, अमोल केसरकर, शुभम मोरे, अभिषेक निलजकर, धनंजय कणबरकर तसेच गल्लीतील इतर कार्यकर्ते उपस्थित होते.