विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा 22 22 वा दीक्षांत समारंभ संपन्न
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या एपीजे अब्दुल कलाम सभागृहात 22 व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल थावर चंद्र गहलोत होते.
यावेळी 22 व्या दिवसात समारंभात एकूण 890 उमेदवारांना पदव्या प्रदान करण्यात आला त्यामध्ये 780 पीएचडी 253 पदवी उत्तर 595 जणांना पदवी प्रदान करण्यात आली यावेळी सर्वाधिक गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थीला 18 सुवर्णपदके आणि 18 रोख पारितोषिक देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे अशा एम लक्ष्मीनारायण सचिन सबनीस विकास किर्लोस्कर यांना मरणोत्तर मानद डॉक्टर प्रदान करण्यात आली
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना राज्यपाल गेहलोत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि म्हणाले की भारताला स्वावलंबी ते जागतिक तंत्रज्ञान केंद्र बनविण्यासाठी तांत्रिक पदवीधरांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले पाहिजे. तांत्रिक विद्यापीठ राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेनुसार स्वावलंबी भारताचे उभारण्यासाठी तांत्रिक पदवीधर आणि अधिकाधिक योगदान द्यावे.
ज्याप्रमाणे यंदाच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी संपादन केले आहे तसेच येणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील अशाच प्रकारचे यश संपादन करून तांत्रिक विद्यापीठाचे नाव उज्वल करावे असे प्रतिपादन केले.
यावेळी या दीक्षांत समारंभात विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरू प्रा एस विद्या शंकर यांनी स्वागत केले त्यानंतर वार्षिक अहवालाचे वाचन करण्यात आले याप्रसंगी व्यासपीठावर कुलगुरू प्रा रंगास्वामी विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे मॅनेजमेंट बोर्ड अकॅडमी कौन्सिल आणि स्टडी बोर्ड सदस्य तसेच सर्व संस्थांचे डी एन यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.