शाळकरी मुलाचा कालव्यात पडून मृत्यू
विजापूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील चिकअसंगी गावच्या हद्दीत शाळकरी मुलगा कालव्यात पडून मृत झाल्याची घटना उघडकीस आली आहे कलैया हिरेमठ वय 13 असे कालव्यात पडलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की कलैया हा शाळेतून घरी आल्यानंतर आपल्या वडिलांना भेटण्याकरिता शेतात गेला होता यावेळी त्याचा पाय घसरल्याने तो कालव्यात पडला. आणि त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कोल्हार पोलीस आणि भेट देऊन पाहणी केली त्यानंतर सकाळी कल्लैयाचा मृतदेह कालव्यात आढळून आला. सदर घटना मूलवाड पाटबंधारे प्रकल्पाच्या मुख्य कालव्यात घडली आहे