*असह्य वृद्ध महिलेला मदतीचा हात*
एका निराधार आणि असह्य वृद्ध महिलेला मदतीचा हात देऊन एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांनी वडगाव येथील एका सुमन या आजीबाईला एका महिन्याचे किराणा सामान आणि त्यांचे घर भाडे देऊन आर्थिक मदत केली आहे.
वडगाव येथील एक वृद्ध महिलेच्या मुलगा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने चार दिवसांपूर्वी मरण पावला. त्या आधी सहा वर्षांपूर्वी त्याची पत्नी ही कर्क रोगामुळे दगावली होती.
त्यामुळे आता आजीबाईचा आधारवडच हरपला होता. ही सर्व परिस्थिती जाणून घेऊन लागलीच एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांनी आजीला मदत केली आहे.
आजीबाई वडगाव येथे एका भाड्याच्या खोलीत राहतात मात्र सध्या त्यांच्या कुटुंबाचा आधारच हरपल्यामुळे त्यांनी धीरखचला होता. तसेच त्या कमावता नसल्याने त्यांच्या आर्थिक परिस्थिती बेताची बनली होती.
मात्र आत्ता मीनाताई यांनी मदतीचा हात दिल्याने त्यांना थोड्या प्रमाणात का होईना त्यांचा भार कमी झाला आहे.यावेळी मीनाताई यांनी आजीची परिस्थिती पाहता त्याही भावुक झाल्या होत्या. याप्रसंगी आजींनी भरभरून आशीर्वाद दिल्याने त्यांना आपल्या आईच्या मायेची उब उमगली यावेळी त्यांच्यासोबत मायक्रो इंडस्ट्रियल असोसिएशनचे रमेश देसुरकर फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर अवधूत तुडयेकर पृथ्वीराज सौरभ सावंत उपस्थित होते.