तीर्थकुंड्ये येथे भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन
खानापूर येथील तीर्थकुंड्ये येथे भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनाकरिता भाजप नेत्या डॉ सोनाली सरनोबत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
तीर्थकुंड्ये येथे आयोजित करण्यात आलेला कुस्ती मैदानाचे उद्घाटन डॉ सोनाली सरनोबत तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
या कुस्ती स्पर्धेसाठी अनेक नामवंत कुस्ती स्पर्धकांनी भाग घेतला होता तसेच अनेकांनी बक्षीसही मिळवली.
या उद्घाटन प्रसंगी विलास बेळगावकर, भरमा पाटील, डॉ सरनोबत संघाचे श्री बाळेश चव्हाणवर, विनायक नाईक, अर्जुन गावडा, अनंत गावडा, आनंद पाटील, कल्लापा कंग्राळकर, मेहुल शहा , तीर्थकुंड्ये ज्येष्ठ नेते लक्ष्मण बन्नर, गुरुनाथ बन्नर, रामलिंग मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.