*माऊली देवीच्या यात्रे निमित पाण्याचे वाटप*
बेळगांव:दिनांक 8 फेब्रुवारीपासून कणकुंबी येथील माऊलीच्या जत्रेला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे देवीचे दर्शन घेण्याकरिता अनेक भाविक गर्दी करत आहेत.
भाविकांना या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी याकरिता जय जवान जय किसान या संघटनेच्या वतीने माऊली जत्रेमध्ये सहभागी झालेल्या भक्तांना पाणी वाटप करण्यात येत आहे.
यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहण्या म्हणून एंजल फाउंडेशन संस्थापिका मीनाताई बेनके यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी त्यांच्या या ठिकाणी सामाजिक कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल कौतुक करण्यात आले त्यानंतर मीनाताई बेनके यांनी यात्रेमध्ये सहभागी झालेल्या भाविकांना पाण्याच्या बाटल्याचे वितरण करण्यात आले.