रेल्वे स्थानकावरील छत्रपतींच्या नावाला व प्रतिमेला कर्वेचा विरोध
कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आज शहरातील रेल्वे स्थानका येथे आंदोलन छेडले यावेळी आंदोलनात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा रेल्वे स्थानकावर न बसविण्याची मागणी केली. आणि आपल्या मागणीचे निवेदन रेल्वे विभागाला दिले.
या निवेदनात कर्वे च्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बसवू नये छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे राजे आहेत त्यामुळे त्यांची प्रतिमा बेळगावच्या रेल्वेस्थानकावर बसविण्यात येऊ नयेत. ते फक्त महाराष्ट्रा पुरतीच मर्यादित असल्याचे या निवेदनात नमुद करून आपले निवेदन रेल्वे विभागाला सादर केले.