कडधान्य मधून रांगोळी साकारण्याच्या स्पर्धेचे आयोजन
2023 हे वर्ष कडधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे त्यामुळे दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ कॉलेजमध्ये आज कडधान्य मधून रांगोळी साकारण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील असलेल्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता पोस्टर गेम आर्ट आणि कडधान्यांमधून रांगोळी साकारण्याची स्पर्धा ठेवली होती यावेळी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विद्यार्थ्यांमधील कलाकारांना वाव मिळावा याकरिता भाऊराव काकतकर महाविद्यालयात दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात त्यामुळे याचाच एक भाग म्हणून यावर्षी कडधान्यांन पासून रांगोळी पोस्टर मेकिंग स्पर्धा आज पार पडली
यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळे कडधान्य वापरून सुबक अशी रांगोळी रेखाटली होती यामध्ये त्यांनी जोंधळा नाचणी गहू तांदूळ भात मूग मटकी नाचणी यासह आणि कडधान्य वापरून रांगोळी रेखाटली होती.