‘तुझ्याशी राणी लगीन करीन गं’ अल्बमच्या चित्रीकरणाला प्रारंभ
बेळगांव: दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी बेळगाव मधील कल्लेहोळ गावात के जे क्रिएशन्स डान्स अकॅडमी यांच्या ‘तुझ्याशी राणी लगीन करीन गं’ पहिल्या मराठी अल्बम सॉंग चे चित्रीकरण झाले कुमार जाधव व महादेव होनगेकर हे या अल्बम सॉंग चे निर्माते आहेत.
या गीताचे दिग्दर्शन बेळगाव मधील लेखक दिग्दर्शक संतोष सुतार यांनी केले आहे या चित्रिकणाच्या शुभमुहूर्त प्रसंगी एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका सौ मिनाताई बेनके तसेच अस्मिता क्रिएशन्सचे श्री राजेश लोहार सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चित्रिकरणाचा मुहूर्त करून सुरुवात करण्यात आली लवकरच हे मराठी गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . या अल्बम सॉंग मध्ये ज्योत्स्ना पाटील ,इंद्रनील जाधव व महादेव होळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत तसेच कुमार जाधव अश्विनी नाईक जितू सांबरेकर ,तेजस्विनी सांबरेकर, आशिष व सारिका हे सहकार आहेत .या अल्बम सॉंग चे नृत्य दिग्दर्शन कुमार जाधव..यांनी केले आहे. तसेच अक्षय दिवटे यांनी डीओपी म्हणून काम पाहिले आहे.