बेळगाव पंढरपूर रेल्वे सेवा पूर्ववत करावी
बेळगावसह आजूबाजूच्या परिसरात वारकऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बेळगाव ते पंढरपूर असा प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांसाठी पूर्वी सुरू असलेली बेळगाव पंढरपूर रेल्वे सेवा पूर्ववत करावी अशी मागणी आज केली यावेळी वारकऱ्यांनी भजनाचे तालावर आंदोलन केले आणि आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.
यावेळी दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाचे प्रिन्सिपल चीफ कमर्शियल मॅनेजर ए एस राव यांना रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली वारकऱ्यांनी निवेदन दिले.
या निवेदनात वारकऱ्यांनी प्रत्येक दिवशी दोन वेळा रेल्वे सेवा उपलब्ध करावी अशी मागणी केली. कोरोनाच्या आधी बेळगाव मधून पंढरपूरला रेल्वे सेवा होती त्यामुळे वारकऱ्यांना पंढरपूरला जाणे सोयीस्कर होत होते मात्र आता आठवड्यातून फक्त एकच दिवस ही सेवा पुरविण्यात येत असल्याने वारकऱ्यांना समस्या निर्माण झाली आहे.
त्यामुळे पूर्वीप्रमाणेच जरूर रोज बेळगाव मधून पंढरपूरला रेल्वे सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे वारकऱ्यांनी रेल्वे विभागाकडे केली.
यावेळी जिल्हा वारकरी संघाचे अध्यक्ष ह भ प शंकर बाबली महाराज दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाच्या असिस्टंट कमर्शियल मॅनेजर निवेदिता स्टेशन मास्तर ह भ प सं भ हनुमंताचे संतराम पाटील ज्ञानेश्वर पवार पांडुरंग जाधव यांच्यासह वारकरी मंडळी निवेदन देण्याकरिता उपस्थित होते.