मराठा मंडळ पदवी महाविद्यालयात जागतिक कर्कदिन साजरा
बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात जागतिक कर्करोग दिन एन.एस.एस. घटक, आयक्यूएसी आणि फार्मसी महाविद्यालय यांच्या संयुक्त आश्रयाखाली साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी नँक समन्वय अधिकारी प्रा. एम.आर. तेली यांनी कर्करोगाबद्दल प्रास्ताविक करून सर्व उपस्थितांचे स्वागत केले.
कार्यक्रमांमध्ये फार्मसी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. नागेश यांनी कर्करोगा विषयी विशेष माहिती दिली. यावेळी फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कर्करोगाच्या जागृती विषयी भाषणे केली. यामध्ये तंबाखू आणि इतर सवयी पासून दूर राहून आपल्याला रोगराई पासून मुक्त, सुदृढ आणि स्वस्थ जीवन कसे जीवन जगता येईल याविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमाला डॉ. डी.एम. मुल्ला, डॉ. प्रसन्ना सुतार, डॉ. इंदिरा आणि अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. अर्चना भोसले यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार मानले.