अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख पदी यांनी स्वीकारला पदभार
अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख पदी एम वेणूगोपाळ हे रुजू झाले आहेत. महानिंग नंदगावी यांच्या बदलीमुळे हे पद रिक्त होते. दोन दिवसापूर्वी वेणुगोपाल यांनी पदभार स्वीकारला.
वेणू गोपाळ यांनी यापूर्वी बेंगळूर ग्रामीण मंडळाकडून गुप्तचर विभागात सेवा बजावली आहे.ते 1994 बॅचचे पोलीस अधिकारी आहेत.
पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्हा पोलिस प्रमुख डॉक्टर संजीव पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. पहिल्या दिवशी त्यांनी चिक्कोडी तालुक्याचा दौराही केला आहे.