मराठा मंडळ पदवी महाविद्यालयात द.रा. बेंद्रे जयंती साजरी
बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि ग्रहविज्ञान महाविद्यालयात कन्नडचे ज्ञानपीठ विजेते साहित्यकार द.रा. बेंद्रे यांचा जन्मदिन महाविद्यालयाच्या कन्नड विभागातर्फे साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर हे अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कन्नड विभाग प्रमुख प्रा. जगदीश यळ्ळुर यांनी प्रास्ताविक करून सर्व उपस्थितांचे स्वागत करुन द.रा. बेंद्रे याच्या जीवन-चरित्रावर प्रकाश टाकला.अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर म्हणाले की, द.रा .बेंद्रे हे यथार्थ परिस्थितीवर विपुल साहित्य केले. त्यांच्या साहित्यातून जनमाणूस सर्व पाठकासमोर उभा राहतो. सामान्य माणसाला त्यांच्या साहित्यातून परिस्थिती वर मात करून जीवन जगण्याची प्रेरणा प्राप्त होते.
या कार्यक्रमाला अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. कार्यकर्माच्या शेवटी सीमा कारभारी यांनी सर्वांचे आभार मानले.