मोहन मोरे बेळगांव अनिल बेनके चषकाचा मानकरी.
बेळगाव ता,18 मोहन मोरे बेळगाव संघाने मुंबईच्या झयान स्पोर्ट्स क्लबचा तब्बल 10 गड्यांनी पराभव करीत अडवोकेट अनिल बेनके चषक पटकाविला.
येथील सरदार शाळेच्या मैदानावर आ अनिल बेनके स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित बेनके चषक खुल्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील बुधवार तारीख 18 रोजी झालेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झयान स्पोर्ट्स मुंबईने 12 षटकात 6 बाद 133 धावा केल्या,त्यांच्या प्रथमेश पवारने 43 मुन्ना शेखने 33, उस्मान पटेलने 19 धावांचे योगदान दिले.मोहन मोरे स्पोर्टसतर्फे प्रज्योत अंबारेने 34 धावांत 2, गणेश धेटेने 33 धावात 2 गडी बाद केले.प्रत्युत्तरादाखल खेळताना मोहन मोरे स्पोर्टसने 12 षटकात 4 बाद 171 धावा केल्या. व पहिल्या डाव्यात बहुमूल्य अशी 38 धावाची आघाडी घेतली, त्यांच्या फरदीन काजीने 18 चेंडू 3 षटकार 7 चौकारासह 50 करण मोरेने 23 चेंडूत 1 षटकार 8 चौकारासह 50 तर मंगेश वैतीने 32 धावांची खेळी केली,, झयान स्पोर्ट्स मुंबईतर्फे बिलाल शेख जुनिअरने 37 धावांत 2, राकेश प्रभुने 50 धावांत 2 गडी बाद केले.दुसऱ्या डावात 38 धावांच्या पिछाडीनंतर फलंदाजी करताना झयान स्पोर्ट्स मुंबईने 12 षटकात 9 बाद 118 धावा केल्या, त्यांच्या कृष्णा पवारने 35, उमर खानने 20, राकेश पोलार्डने 23 धावांचे योगदान दिले, मोहन मोरे तर्फे प्रज्योत अंबिरेने 23 धावांत 3 गडी, ओवेस बाबाने 26 धावात 2 गडी बाद केले प्रत्युत्तरादाखल खेळताना 72 धावांचे आव्हान घेऊन फलंदाजी करताना मोहन मोरे संघाने अवघ्या 6.2 षटकात बिनबाद 76 धावा करीत सामना तब्बल 10 गड्यानी जिंकत अनिल बेनके चषक पटकावित रोख 5 लाखांचा मानकरी ठरला. त्यांच्या सलामीवीर फरदीन काजीने अवघ्या 17 चेंडूत 2 षटकार 6 चौकारासह नाबाद 44, करण मोरेने 4 चौकारासह 28 धावाची नाबाद खेळी करित विजयाचा कळस रोवला.
प्रमुख पाहुणे आमदार पुरस्कर्ते अनिल बेनके आमदार अभय पाटील माजी आमदार संजय पाटील, माजी विधान परिषद सदस्य महातेश कवटगीमठ ,जयप्रकाश, रामचंद्र मन्नोळकर विजय जाधव इतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना चषक, रोख रक्कम,व मालिकावीर विजेत्या करण मोरेला रॉयल इनफिल्ड दुचाकी वाहन तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रसाद शिरवलकर श्री स्पोर्ट्स खडकगल्ली, उत्कृष्ट फलंदाज मुन्ना शेख मुंबई, उत्कृष्ट गोलंदाज प्रज्योत अंबिरे मोहन मोरे, यांनाही चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.या अंतिम सामन्याला पंच म्हणून सचिन सांगेकर मुंबई, सुनील पाटील कोल्हापूर,अनंत माळवी बेळगाव ,समालोचक प्रमोद जपे, मोहन वाळवेकर, युवराज पाटील ,आरिफ बाळेकुंद्री बेळगाव ,चंद्रकांत शेटे मुंबई, स्कोरर सुजित शिंदोळकर ,गणेश मुतगेकर, विठ्ठल दुर्गाई, वहाब गोरेखान, तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विनायक पवार, राहुल जाधव, मनोज ताशीलदार ,शंकर पाटील, विनायक पवारसह अनिल बेनके फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले