रस्ते सुरक्षा सप्ताह निमित्त रिक्षाचालकांकरिता जनजागृती कार्यक्रम
रस्ते सुरक्षा सप्ताह निमित्त विजया आर्थो अँड ट्रॉमा सेंटर चे संचालक, भाजप मेडिकल्स सेल डॉक्टर रवी पाटील आणि रहदारी उत्तर वाहतूक पोलिसांच्या वतीने रिक्षा चालकांकरीता रस्ते सुरक्षा अपघात जनजागृती सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी या जनजागृती कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रहदारी वाहतूक उत्तर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी उपस्थित होते.
प्रारंभी त्यांचे स्वागत डॉक्टर रवी पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन केले त्यानंतर डॉ रवी पाटील यांनी रिक्षा चालकांना आरोग्य सुदृढ राहायचं असेल तर रोज व्यायाम करायला हवा,आरोग्य सुदृढ आणि निरोगी ठेवायला हवे असे सांगून त्यांना मार्गदर्शन केले . त्याचबरोबर रिक्षा चालक कधीही हॉस्पिटलमध्ये येऊन मोफत आरोग्य तपासणी करून घेऊ शकतात असे सांगितले.
यावेळी या कार्यक्रमात रहदारी वाहतूक उत्तर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक श्रीशेल गाबी यांनी सर्व ऑटो रिक्षा चालकांना मार्गदर्शन केले आणि इन्शुरन्स किती महत्त्वाचे आहे याबद्दल सांगितले. त्याबरोबरच आपली रिक्षा पार्किंगमध्ये पार्क करावी, वाहतुकीचे नियम पाळावे, रिक्षा सुरक्षा बाळगावी असे मोलाचे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी या जनजागृती कार्यक्रमात डॉक्टर रवी पाटील, सीईओ संजीव, प्रशासक शिल्पा गोदेगरी प्रशासक प्रताप आणि प्रशासक राघवेंद्र यांच्यासह ऑटो रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.