कुद्रेमनीत मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
भजन टाळ आणि मृदंगाच्या गजरात कुद्रेमणी येथे उत्साही वातावरणात ग्रंथ दिंडीने संमेलनाला सुरुवात करण्यात आली. श्री बालाजी साहित्य संघ कुद्रेमणी आणि ग्रामस्थ आयोजित 17 व्या मराठी साहित्य संमेलनात अनेकांनी आपली उपस्थिती दर्शवून संमेलन उत्साहात पार पाडले.
https://fb.watch/i4TCLNFlYI/
यावेळी विठ्ठल रखुमाई मूर्तीचे पूजन मंदिर बांधकाम कमिटी अध्यक्ष परशराम पाटील व प्रकाश गुरव या दांपत्याच्या हस्ते झाले तर पालखी पूजन ह भ प मारुती सुतार व ग्रंथ पूजन ग्रामपंचायत माजी सदस्य अर्जुन जांबोटकर यांच्या हस्ते झाले. पालखी पूजन प्रकाश पाटील यांच्या हस्ते झाल्यानंतर ह भ निंगाप्पा उर्फ बाबुराव पाटील यांनी हरिनामाचा मंत्र जप केला. त्यानंतर लक्ष्मी गल्ली चव्हाट गल्ली शिवाजी चौक शिवाजी रोड मार्गे ग्रंथ दिंडी कै परशुराम मीनाजी गुरव संमेलन स्थळी आली.
यावेळी ग्रंथपालखी माळा फुलांनी आकर्षक अशी सजविण्यात आले होते त्यानंतर गावात ढोल ताशा पथक ज्ञानेश्वरी सांप्रदायिक भजनी मंडळ विठ्ठल रखुमाई सांप्रदायिक भजनी मंडळाचे अभंगवाणी शिवज्ञा ढोल ताशा पथक राकस कोप शिवकालीन प्रात्यक्षिके मराठीमुळे वेश परिधान केलेल्या मुला-मुलींच्या सहभाग दारोदारी रांगोळीचे सडे यामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे होते. यावेळी त्यांनी स्वतःच्या मातृभाषेच्या राज्यात जाण्याची मागणी स्वाभाविक आहे मातृभाषेतून साहित्य अधिक समृद्ध होते. दोन राज्यांना जोडण्याचे आणि गोडवा निर्माण करण्याचे काम साहित्य करते त्यामुळे आपल्या मातृभाषेच्या समृद्धीसाठी पुढे येणे प्रत्येकाचे काम आहे आज आधुनिक यांत्रिकीकरणामुळे जग अगदी जवळ आले आहे अशा परिस्थितीत माणूस म्हणून जगताना लेखकाने आपली भूमिका ठामपणे मांडली पाहिजे असे प्रतिपादन केले.
त्यानंतर वेगवेगळ्या सत्रात येथे मराठी साहित्य संमेलन पार पडले यावेळी व्यासपीठावर जिल्हा पंचायत माजी सदस्या सरस्वती पाटील ग्रामपंचायत अध्यक्षा रेणुका नाईक सदस्य आरती लोहार संघाचे अध्यक्ष मारुती पाटील आर आय पाटील माजी महापौर शिवाजी सुंठकर जोतिबा बडसकर एडवोकेट श्याम पाटील माजी महापौर मारुती अष्टेकर चेतन पाटील मोहन पाटील उपस्थित होते. याप्रसंगी मारुती पाटील यांनी प्रास्ताविक केले तर ग्रामपंचायत माजी सदस्य नागेश राजगोळकर यांनी स्वागत केले आणि माणिक गोवेकर व डॉक्टर मधुरा गुरव यांनी सूत्रसंचालन केले.