नितीन गडकरी यांना बेळगाव जेलमधून धमकी
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन आल्या प्रकरणी तपास करण्यासाठी बेळगावातील हिंड लगा जेलमध्ये नागपूर पोलीस शनिवारी रात्री दाखल झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
नितीन गडकरी. यांना शनिवारी सकाळी धमकीचा फोन आला होता.त्या नंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे .पोलीस खात्याने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून नागपूर पोलीस बेळगावात दाखल झाले आहेत.कोल्हापूर ,सांगली आणि बेळगाव पोलीस त्यांना तपासात मदत करत आहेत शनिवारी रात्री दोन तासाहून अधिक कल जेलमध्ये शोध मोहीम राबवण्यात आली असून रविवारी पुन्हा जेलमध्ये शोध मोहीम राबवून तपास करण्यात येणार आहे.