भरतेश एज्युकेशन ट्रस्ट हीरक महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
भरतेश एज्युकेशन ट्रस्ट हीरक महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आज बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत परदेश एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.
यावेळी या पत्रकार परिषदेत त्यांनी होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली. दिनांक 17 जानेवारी ते 20 जानेवारी यादरम्यान भरदेश एज्युकेशन ट्रस्ट मध्ये भरगच्च असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 17 रोजी डीवाय चौगुले भरतेश हायस्कूल स्कूलचा हीरक महोत्सव साजरा होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कन्नड अभिनेते आणि शाळेचे माजी विद्यार्थी चरणराज हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत.तसेच दिनांक 18 रोजी मिशिष्ट मेलडीज हा कार्यक्रम अपर्णा भट सादरीकरण करणार आहेत
दिनांक 19 जानेवारी रोजी पद्मराज भरतेश कॉलेज ऑफ बिझनेस ऍडमिनेशन बीबीए चा रजत महोत्सव साजरा होणार आहे. तर शेवटच्या दिवशी म्हणजे 20 जानेवारी रोजी बिग इट ऑन बॉलीवूड हा रंगारंग कार्यक्रम सादर होणार असून या कार्यक्रमाला बॉलीवूडचे ख्यातनाम गायक सचेत व परंपरा उपस्थित राहणार राहणार असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत भरतेस एज्युकेशन अँड ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
या पत्रकार परिषदेत चेअरमन जीनदत्त देसाई, राजीव दोडण्णावर,भूषण मिरजी, श्रीपाद खेमलापुरे सावित्री दोडण्णावर विनोद दोडण्णावर उपस्थित होते.