This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

बहुजन समाज यमकमर्डी मतदार संघ यांच्या वतीने उद्या स्वराज्य संकल्प मेळाव्याचे आयोजन

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बहुजन समाज यमकमर्डी मतदार संघ यांच्या वतीने उद्या स्वराज्य संकल्प मेळाव्याचे आयोजन

बहुजन समाज यमकमर्डी मतदार संघ यांच्या वतीने उद्या कडोली गावामध्ये स्वराज्य संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत बहुजन समाज यमकनमर्डी मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

 

 

 

आज येथील शहरातील कन्नड साहित्य भवन मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होतते.यावेळी ही माहिती देण्यात आली. तसेच या स्वराज संकल्प मेळाव्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.

 

 

 

सदर स्वराज्य संकल्प मेळावा उद्या शुक्रवार दिनांक 13 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता कडोली येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज मैदानावर पार पडणारा असून या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे उपस्थित असणारच त्याची माहिती देण्यात आली.

 

 

 

डॉ.अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावर आधारित अनेक चित्रपट आणि मालिका साकारल्या आहेत.

 

 

त्यामुळे त्यांना कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय धर्माचार्य परमपूज्य भगवान वीर महाराज आणि परमपूज्य गुरु बसवलिंग महास्वामीजी यांचे देखील प्रमुख उपस्थिति या स्वराज संकल्प मेळाव्याला असणार असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

 

 

यावेळी या पत्रकार परिषदेत भाऊ गडकरी राजू मायांना आनंद पाटील शुभांगी पवनोजी अरुण कटांबळे यांच्यासह बहुजन समाज यमकनमर्डी मतदारसंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now