धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना निवडणुकीत जनता चांगलाच धडा शिकवेल
धर्माच्या नावावरून सध्या राजकारण सुरू आहे जर राजकारण करायचं असेल तर विकासाचे राजकारण करा असे वक्तव्य यमकनमर्डीचे आमदार आणि केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केले.
ते यमकनमर्डी मतदारसंघातील शहाबंदर आणि इस्लामपूर या गावात वाल्मिकी पुतळा स्थापनेत अडथळे आणणाऱ्या चा निषेध करण्याकरिता आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते
यावेळी ते म्हणाले की भाजप देशाचे राजकारण करत आहे त्यामुळे जनताच भाजपला चूक प्रत्युत्तर देणार आहे. जर भाजपला राजकारण करायचं असेल तर त्यांनी विकासाचे राजकारण करायला हवे जातीपातीचे राजकारण जर त्यांना चांगलाच दणका बसेल असे यावेळी सांगितले.
त्यानंतर त्यांनी यमकनमर्डी मतदारसंघात कोठे कोट्यवधी रुपयांच्या अनुदानातून विकास कामे सुरू आहेत याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी भाजप आणि आरएसएसच्या कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत बसवेश्वरांचे फोटो का लावण्यात आले नाहीत असा प्रश्न उपस्थित केला.
आणि सांगितले की मागील निवडणुकीत धनुष्यबाणाचा वापर करावा लागला नाही मात्र येणाऱ्या निवडणुकीसाठी वर्षभरापासून आम्ही धनुष्यबाण घेऊन बसलो आहे.मला कोणत्याही प्रचाराची गरज नाही मला गेल्या निवडणुकीत जनतेने निवडून दिले आहे. आणि जनता आता देखील आपले काम योग्य प्रमाणेच करेल असे सांगितले. तसेच आपल्या भाषणातून विरोधकांना त्यांनी चांगलाच इशारा दिला.
त्यावेळी या कार्यक्रमात युवा नेते राहुल जारकीहोळी करिपा गुरणावर,जंगली साहेब नायक किरण रजपूत, मगतुमसाब अप्पू बाई चाचा शंकर डोंगरे यांच्यासह शहाबंदर व इस्लामपूर मधील नागरिक उपस्थित होते.