राष्ट्रीय दिव्यांग टेबल टेनिस स्पर्धेत संजीव हणमण्णावर यांना रौप्यपदक.
बेळगाव ता,10. केपीटीसीएलचे सहाय्यक कार्यकारी अभियंता राष्ट्रीय प्यारा ओलंपिक टेबल टेनिस खेळाडू संजीव हणमंण्णावर यांनी दिव्यांगांच्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत रौप्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
पणजी गोवा येथील दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर इनडोर स्टेडियमच्या सभागृहात गोवा राज्य सरकार आयोजित दिव्यांगाच्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करताना बेळगावच्या केपीटीसीएलचे सहाय्यक कार्यकारी अभियंता संजीव हणमंण्णावर यांनी एस-7 या गटात संजीव हणमंण्णावरने यांनी पहिल्या सामन्यात मुकेश सेन दिल्ली यांचा 3-0, दुसऱ्या सामन्यात संजीव यांनी हरिष शर्मा उत्तर प्रदेश याचा 3-0 तर उपांत्य लढतीत संजीव हणमंण्णावरने बेंगलोरच्या डॉ,नझीम यांचा 3-1 असा पराभव केला, तर अंतिम लढतील दिल्लीच्या अन्शुंल अग्रवाल यांनी संजीव हणमण्णावर यांचा 3-0 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले व संजीव हणमंण्णावर यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
प्रमुख पाहुणे गोवा राज्याचे खेल क्रीडाप्राधिकरण अधिकारी डॉ गिता नावगेकर व गोवा राज्य दिव्यांग आयुक्त गुरूप्रसाद पावसकर यांच्या हस्ते संजीव हणमंण्णावर यांचा सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेत कर्नाटक राज्यातून 16 खेळाडूंनी भाग घेतला होता, यात बेळगांवच्या दिनेश सिद्धगवळीने व्हीलचेअर टेबल टेनिस स्पर्धेत कास्यपदक तर सविता आज्जनकट्टी हिने महिलांच्या एस-8 क्लास या गटात रौप्यपदक पटकाविले आहे.संजीव हणमण्णावर हे दिव्यांग राष्ट्रीय मानांकनमध्ये अव्वल, असून एशियामध्ये 12वा क्रमांक ,तर जागतिक मानांकनमध्ये 54 व्या क्रमांकावर आहेत.
संजीव यांना संगम बैलूर बेळगाव टेबल टेनिस अकादमीचे प्रशिक्षक संगम बैलूर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.