कंग्राळी बुद्रुक येथील यल्लमा देवीची यात्रा उत्साहात संपन्न
सौंदत्ती यल्लमा डोंगराकडे शाकंभरी पौर्णिमेनिमित्त मार्गस्थ झालेले कंग्राळी बुद्रुक येथील सर्व भाविक आज आपल्या गावी परतले आहेत.
येथील सर्व भाविक पारथी घेऊन यल्लमा डोंगराकडे गेल्या आठवड्यात रवाना झाले होते. यावेळी त्यांनी त्या ठिकाणी आठ दिवस मुक्काम केल्यानंतर तसेच सर्व धार्मिक विधी पार पाडल्यानंतर आज गावाकडे माघारी आले आहेत.
https://www.facebook.com/DMEDIA24/videos/1415388705942810/?mibextid=Nif5oz
सर्व भविक गावी आल्यानंतर या ठिकाणी पडल्या भरण्याचा कार्यक्रम झाला. दर तीन वर्षांनी अशाच प्रकारे गावामध्ये देवीचा जल्लोष करण्यात येतो.
https://www.facebook.com/DMEDIA24/videos/1415388705942810/?mibextid=Nif5oz
आज भंडाऱ्याच्या उधळणीत देवीचे स्वागत केल्यानंतर सर्व भाविक या ठिकाणी आपल्या हातून कोणती चूक झाली असल्यास क्षमा कर आणि आमच्या हातून तुझी कायम सेवा करून घे अशी प्रार्थना केली. आणि सर्वजण पडल्या घेऊन तसेच देवीचा जग घेऊन आपल्या घरी मार्गस्थ झाले.