टाकीत पडून दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू
पाण्याच्या टाकीत पडून दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील गर्लहोसुर येथे ही दुर्घटना घडली.नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी चार वर्षाच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मंगळवारी दुपारी बारा वाजता ही दुर्घटना घडली.श्लोक शंभूलिंगप्पा गुडी आणि चिदानंद प्रकाश साळुंखे अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत.घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.