रवी कोकितकर यांच्यावर गोळीबार
हिंदू संघटनेचे नेते रवी कोकितकर यांच्यावर आज सायंकाळी गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत ते जखमी झाले असून त्यांच्यावर केएलई इस्पितळात उपचार सुरू आहेत.
आज ते हिंडलगा परिसरामधून कारमधून जात असताना अज्ञात आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. या घटनेत त्यांच्या मानेला गोळी लागली असून त्यांच्या वाहन चालकाला देखील दुखापत झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली मात्र रवी कोकितकर यांच्यावर गोळी कुणी आणि कशासाठी झाडली हे अध्यापही समजू शकले नाही मात्र पोलीसांनी याबाबत तपास हाती घेतला आहे.