मराठी” लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
अलीकडेच मध्यवर्ती बस स्थानकाचे नुतनीकरण करून उदघाटन करण्यात आले होते, बस स्थानकांवर “मराठीला” डावल्याने उदघाटनापूर्वीच म. ए. युवा समितीने बेळगावच्या परिवहनच्या मुख्य नियंत्रकांना भेटून निवेदन देत मराठीची भाषेत फलक लावण्याची मागणी केली होती पण परिवहन विभागाने मराठीला डावलून बस स्थानकाचे उदघाटन केले, निवेदन देऊन सुद्धा मराठी भाषेला डावलण्यात आल्याने परिवहन विभागाच्या विरोधात तक्रार म. ए. युवा समितीने केंद्रीय अल्पसंख्याक आयोग, केंद्रीय मंत्री तसेच केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाकडे केली होती.
सदर तक्रारीची दखल केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाने घेतली आहे आणि बस स्थानकावरील फलक, बस फलाटावर आणि बसेसवर मराठी मध्ये लावण्यासाठी अल्पसंख्याक आयोगाने कर्नाटक राज्याच्या मुख्य सचिवांना, अल्पसंख्याक कल्याण विभागाच्या सचिवांना आणि बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे कमिशनर शिवकुमार यांनी कर्नाटकाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देताना कायद्याचा दाखला देत “ज्या भागात १५% हुन अधिक इतर भाषिक राहतात त्यांना त्यांच्या भाषेत सर्व कागदपत्रे, दिशाफलक, माहिती दिली पाहिजेत तसेच कर्नाटक राज्य भाषा अधिनियम १९८१ आणि २०१४ साली कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची त्यांना आठवण करून दिली आहे.
सदर युवा समिती ने केलेल्या तक्रारीवर कार्यवाही करून अल्पसंख्याक आयोगाकडे माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे