लिंगायत समाजाचे राज्यव्यापी आंदोलन मुंबईत
लिंगायत समाजाच्या वतीने मुंबईत राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आज लिंगायत समन्वयक समितीचे राष्ट्रीय समन्वयक अविनाश भुशीकर यांनी दिली.
येथील चन्नम्मा सर्कल जवळ येईल कन्नडा साहित्य भवन मध्ये आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनी ही माहिती दिली तसेच लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा आणि अल्पसंख्यांक दर्जा मिळण्यासाठी कर्नाटका प्रमाणेच इतर राज्यातही आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर आंदोलन 29 जानेवारी रोजी मुंबईत होणार असून या आंदोलनात कर्नाटका प्रमाणेच महाराष्ट्रात देखील लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म आणि अल्पसंख्यांक दर्जा मिळवण्याबाबत आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले. आणि जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचे देखील त्यांनी याप्रसंगी सांगितले.
यावेळी या पत्रकार परिषदेत लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी शंकर गुडस यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.