कॉरी असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषद
शहरात खान आणि क्रशरमालक संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या पत्रकार परिषदेत सरकार खाण मालकांकडून पैसे गोळा करत असल्याचा आरोप करण्यात आला.
तसेच सरकार 30 टक्के भांडवल देण्यासाठी आमच्या वर दबाव टाकत आहे. दगड आणि खाणीतून सरकारला रॉयल्टी मिळाली. मात्र पुन्हा रॉयल्टी देण्यासाठी भाजप सरकारने आमच्यावर अन्याय करत असल्याचा आरोप यावेळी पत्रकार परिषदेत खान आणि क्रशर मालकांनी केला
तसेच भाजप सरकार आमच्या बाजूने असताना त्यांनी आवाज उठविला मात्र आता भाजप सरकारच आम्हाला न्याय देण्यात अपयशी ठरले असल्याचे यावेळी सांगितले. तसेच दगड खाण वरील रॉयल्टी देणे बंद करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली.
ही पत्रकार परिषद कन्नड साहित्य भवन येथे आयोजित करण्यात आली होती.यावेळी या पत्रकार परिषदेत पीएम पाटील शिवानंद पडगुडी वसंत तहसीलदार फैयाज अंकलगी संदीप अवलारकर यांच्यासह खान आणि क्रशर मालक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.