पथदिप रात्री ऐवजी दिवसा सुरू……!!!
लाखो रुपये खर्च करून स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात विद्युत खांब बसविण्यात आले आहेत. या खांबांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे मात्र त्याचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागणार आहे.
येथील बेळगाव दक्षिण मतदार क्षेत्रामध्ये मिलिटरी महादेव मंदिर ते फर्स्ट रेल्वे गेट पर्यंत एका पथदीप सुरूच होते.स्मार्ट सिटी अंतर्गत लाखो रुपये खर्च करून फूटपाथवर वीस ते तीस फूट अंतरावर स्मार्ट पथदीप बसविण्यात आले आहेत.मात्र हे पथदिप रात्री ऐवजी दिवसभर सुरूच होते.
काल सोमवारी हे सर्व पथदीप दिवसाढवळ्या सुरूच असल्याचे निदर्शनास आले. मात्र याबाबत कोणीही अधिकाऱ्यांकडे तक्रार न करता गपचूप मुग गिळून शांत बसल्याचे पाहायला मिळाले.
त्यामुळे अशा शहरात घडणाऱ्या गोष्टींकडे गांभीर्याने कोणीतरी लक्ष देऊन नुकसान टाळणे गरजेचे आहे जर असे न झाल्यास सरकार कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याकडूनच याचा उदंड वसूल करणार हे मात्र निश्चित आहे.
तसेच विजेचा अपव्य टाळा हे सांगणाऱ्या शासनाने आता तरी जागे होऊन रस्त्यावरील दिवसाढवळा सुरू असलेले पथदीप बंद करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.