रयत गल्लीतील बैलगाडी यल्लमा डोंगराकडे प्रस्थान
शाकंभरी पौर्णिमेनिमित्त सर्व भाविक यल्लामा डोंगराकडे प्रस्थान करत आहेत. शाकंभरी पौर्णिमा ही सहा जानेवारीला असल्याने सर्व भक्तांची लगबग सुरू झाली आहे. गेल्या अनेक शेकडो वर्षांपासून बेळगाव मधून यलामा डोंगराकडे जाण्याची प्रथा आहे. आणि ही प्रथा आजही पाळली जात असून तालुक्या सह शहरांतील अनेक बैलगाड्या शाकंभरी पौर्णिमेनिमित्त यलाम्मा डोंगराकडे रवाना झाल्या आहेत.
येथील रयत गल्ली होसुर येथील यल्लामा भक्त यांनी काल बैलगाडी मधून यलामा डोंगराकडे प्रस्थान केले आहे.उदो ग आ ई उदो चा गजर करत भाविक
डोंगराकडे निघाले आहेत.
आपली संस्कृती आणि परंपरा जपावी याकरिता आधुनिक काळात देखील सर्वजण आपला वारसा पुढील पिढीकडे सोपवत असल्याचे या माध्यमातून पाहायला मिळाले आहे.
सौंदत्ती यल्लामा डोंगराकडे जाण्याकरिता अनेक वाहने उपलब्ध आहेत.मात्र ही परंपरा खंडित न ठेवायचा मानस ठेवत आजही अनेक भक्तांनीही परंपरा रुजू ठेवली आहे. तसेच हा आपला वारसा पुढील पिढीकडे सोबत आहेत.
काल निघालेले भाविक बैलगाडी मधून दोन ते तीन दिवसात जोगणभावी येथे दाखल होणार आहेत. त्यानंतर सौंदत्ती डोंगरावर विधिवत पूजन पार पाडल्यानंतर त्या ठिकाणी दोन ते तीन दिवसांचा मुक्काम करणार आहे तसेच शाकंभरी पौर्णिमा झाला नंतर पुन्हा माघारी परतणार आहेत.