मलेशिया येथे पार पडणाऱ्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनाला दलित नेते मल्लेश चौगुले यांना अतिथी म्हणून आमंत्रित
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ व डॉक्टर आंबेडकर वेल्फेअर असोसिएशन मलेशिया यांच्याद्वारे आयोजित दुसरे आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन क्वालांलपूर मलेशिया येथे 4 व 5 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. आणि या कार्यक्रमाला अतिथी म्हणून दलित नेते मल्लेश चौगुले उपस्थित राहणार आहेत.
मलेशिया येथील हॉटेल ग्रँड कॉन्टिनेन्टल क्वालांलपूर येथे दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता या संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार असून उद्घाटक म्हणून उपमंत्री उद्यामिता विकास आणि सहकारीता मंत्रालयाचे मा.वाई बी सिनेटर सृश्री सरस्वती कंडासामी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
त्यानंतर दुपारी बारा वाजता संविधान जागर दुपारी दोन वाजता आंबेडकरवादी विश्व साहित्याची भूमिका चार वाजता बौद्ध साहित्याने जगाला काय दिले सहा वाजता आंबेडकर वादाशी पाहिजे जगातील स्त्रियांचे उत्थान नाही आणि आठ वाजता आंतरराष्ट्रीय काव्य संमेलन पार पडणार आहे. तर दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे वेगवेगळ्या विषयावर अनेक मान्यवर आपले मनोगत व्यक्त करणार आहेत
मलेशिया येथे आयोजित केलेल्या दुसरे आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनाकरिता आज मल्लेश चौगुले बेळगाव येथून रवाना झाले आहेत.