शरद पवार यांची समिती नेत्यांनी घेतली भेट
समिती पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कोल्हापूर येथे भेट घेतली आणि सीमा प्रश्न संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. गेल्या किती वर्षांपासून सीमा प्रश्न सोडविण्यात अडथळे येत आहेत त्यामुळे आपण जातीने यामध्ये लक्ष घालावे आणि सीमावासीयांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी समिती पदाधिकाऱ्यांनी यावेळी शरद पवार यांच्याकडे केली.