बी के मॉडेल हाय स्कूल मध्ये फौंडर्स डे निमित्त आंतरशालेय प्रतिभा संगम स्पर्धा
बी के मॉडेल हाय स्कूल मध्ये फौंडर्स डे निमित्त आंतरशालेय प्रतिभा संगम स्पर्धा यशस्वी. बी इ संस्थेच्या बी के मॉडेल हाय स्कूल मध्ये फौंडर्स डे निमित्त प्रतिभा संगम या नावाने आंतरशालेय स्पर्धा दि. २७ जानेवारी २०२३ रोजी शाळेच्या शाळेच्या आवरणात आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये चित्रकला, हस्ताक्षर, योगासन, प्रश्नमंजुषा व जानपद नृत्य सामील होत्या. बेळगाव तालुका व शहरातील वेग वेगळ्या शाळेच्या विध्यार्थानी खहोप मोठ्या संख्येने उत्सुकते भाग घेतला आणि बक्षीस हि मिळवली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी श्री श्रीपाद जोशी आणि श्रीमती अंजना जोशी उपस्थित होत्या. “आजच्या स्पर्धात्मक युगात असली स्पर्धा खहोप गरजेचे आहेत. विद्यार्थ्यांमध्ये साधेनेची जिद्द किंवा एक योग्य नागरिक बनण्यासाठी जी शिस्त आणि परिश्रम लागते ती आमची शाळा आधी पासून पुरवत आहे आणि आता हि पुरवते. त्या मुळेच बरेच नामवंत ह्या शाळेतून घडले. आणि हीच त्या फौंडर्स ना दिलीजाणारी खरी श्रद्धांजली व सम्मान.” असे श्री श्रीपाद जोशीनि आपली भावना व्यक्त केली.
शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती शैला चाटे, वरिष्ठ शिक्षक श्री सुरेश जोशी आणि स्पर्धा संयोजक श्री वय. पी. पाटील हे उपस्थित होते. या वेळी अमृता हुक्केरी यांनी पाहुण्यांचे स्वागत करून श्री आर आय गुरव यांनी आभार व्यक्त केला. विविध शाळेचे विध्यार्थी, शिक्षक व पालक या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.