दलित लेखक व विचारवंतांचे राज्यस्तरीय संमेलन 29 रोजी
बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न असलेल्या समता आणि स्वातंत्र्याचा समतोल साधण्यासाठी दलित लेखक व विचारवंतांचे राज्यस्तरीय संमेलन 29 रोजी कुमार गंधर्व कलामंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे.अशी माहिती आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बीडीएसएचे राज्य सरचिटणीस डॉ.विश्वनाथ यांनी दिली
यावेळी ते म्हणाले की राष्ट्रीय अध्यक्ष एस.पी.सोमाक्षी व प्रदेश सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली सलग 38 वर्षे दलित अधिवेशन साजरे केले जात आहे.प्रत्येक राज्यात दलित परिषदांचे आयोजन करण्यात आले असून दलित समाजाच्या उन्नतीसाठी राष्ट्रीय पातळीवरील विचारवंत, लेखकांच्या विचारांची लोकांना जाणीव करून दिली जात आहे .त्यामुळे हा राज्यस्तरीय कार्यक्रम अभूतपूर्व यशस्वी व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली
त्यानंतर त्यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाटबंधारे मंत्री तथा जिल्हा प्रभारी मंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगितले . तसेच यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष एस.पी.सोमाक्षी, खासदार मंगला सुरेश अंगडी, माजी मंत्री रमेश जारकीहोळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली
तसेच हा कार्यक्रम दोन टप्प्यात आयोजित करण्यात येणार असून महिला व बालविकास या विषयावर विशेष व्याख्यान देणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी दलित संघटनेचे सदस्य राजू कोलकार उपस्थित होते