जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन महत्त्वाचे प्रा मायाप्पा पाटील
विद्यार्थ्यांनो पुस्तक वाचा, तुम्ही पुस्तके वाचालात तर वाचाल नाहीतर यशस्वी होण्यास मार्ग कठीण आहे. असे उद्गार राणी पार्वती देवी महाविद्यालयाचे प्राध्यापक मायाप्पा पाटील यांनी पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाचा स्नेहसंमेलन प्रसंगी काढले. स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी विश्वभारत सेवा समिती बेळगावचे उपाध्यक्ष श्री नेताजीराव कटांबळे हे होते.
वडगाव येथील अन्नपूर्णेश्वरी मंगल कार्यालयात पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन, बक्षीस वितरण, सेवानिवृत्त प्राध्यापकांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रोटेरीयन निलेश पाटील, रोटेरियन डॉ. मनोज सुतार श्री सुरेश कळेकर, संस्थेचे सचिव श्री प्रकाश नंदिहळी, संचालक परशराम गोरल, विजय साखळकर, गजानन घुग्रेटकर, यल्लाप्पा कुकडोळकर, विमल कंग्राळकर, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश नंदिहळी यांनी केले व पाहुण्यांचा परिचय प्राचार्या ममता पवार यांनी केला. वार्षिक अहवालाचे वाचन प्रा. स्मिता मुतगेकर यांनी केले.
डॉ. मनोज सुतार यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक व आई-वडिलांचा आदर करणे किती महत्त्वाचे आहे हे पटवून दिले. व निलेश पाटील यांनी आपण जीवनात यश मिळवण्यासाठी कसे कर्तुत्वनिष्ठ असले पाहिजे. स्वतःच्या जीवनातील उदाहरण देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नतंर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक श्री वाय टी मुचंडी यांचा सेवानिवृत्त निमित्त, कार्यक्रमाचे अध्यक्ष नेताजी कटांबळे व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाचे सन 2022-23 सालामध्ये विविध स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. तसेच पीयूसी बोर्ड परीक्षेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध विषयांमध्ये 90 पेक्षा जास्त मार्क्स घेतलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. तदनंतर सन 2022-23 सालातील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून श्रेयश कुंडेकर व उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून संजना कोलकर व उत्कृष्ट खेळाडू म्हणून वेदिका खन्नूकर व भूषण नावगेकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दुसऱ्या सत्रामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा राजू हळब, प्रा सुरज हत्तलगे, प्रा रेणुका चलवेटकर, प्रा. प्रियांका कांबळे, प्रा. के एल शिंदे, प्रा. लक्ष्मण बांडगे, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मयूर नागेनहट्टी आणि आभार प्रदर्शन प्रा धनश्री गाडे यांनी केले.