नवजीवन हॉस्पिटलच्या वतीने ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा
महादेव आर्केड येथे नवजीवन फाउंडेशन आणि नवजीवन हॉस्पिटलच्या वतीने ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात प्रतिष्ठानतर्फे क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जलतरण प्रशिक्षक श्री उमेश कलघटगी हे शारिरीकदृष्ट्या अपंग मुलांना मोफत प्रशिक्षण देणारे व्यक्तीमत्व आहेत त्यामुळे त्यांच्या सत्कार करण्यात आला.
तसेच अनिकेत पिळणकर, श्रीकांत देसाई, सिमरन गौंडडकर, पृथ्वी प्रज्वल, शरण्य कंबार, अमन सुंगार आणि उमेश खाडे.
फाऊंडेशनने योग प्रशिक्षक श्री किशन थोरात, सेल्फ मेड मॅन आणि अमेरिकन गॉट टॅलेंटसह अनेक स्पर्धांचे विजेते यांचाही सत्कार केला गेला .
त्यासोबतच फाऊंडेशनने बॉडी बिल्डरचे प्रशिक्षक श्री एम गंगाधर आणि इतर बॉडी बिल्डर्स श्री नागेंद्र मडिवाल, श्री प्रताप कलकुंद्रीकर, श्री बबन पोटे यांचा सत्कार केला.
यानंतर फाऊंडेशनने 3 वेळा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डर लिंबो स्केटिंग श रोहन ए कोकणे यांचा सत्कार केला. त्यांनी विविध देशांमध्ये स्केटिंगसाठी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.त्याचबरोबर अखिल कर्नाटक माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष बी.ए. तिलगंजी यांचाही सत्कार केला.
याप्रसंगी अध्यक्ष डॉ सतीश आर चौलीगर, आकाश होसमनी, गीता होसमनी, प्रवीण नायकर, डॉ स्वप्ना चौलीगर, सिद्धू,आर.एम.चौलीगर, सिद्धरामनगौडा पाटील, बसवराज चौलिगर, बसवंत करनवी, डॉ. बेनके, अनुप होसट्टी, प्रवीण पाटील, डॉ. जगत शंकरगौडा, आनंद कबाडी, आनंद तिप्पण्णावर, प्रशांत पाटील, नवजीवन फाऊंडेशन टीम, नवजीवन हॉस्पिटलचे कर्मचारी, महादेव आर्केड, रहिवासी उपस्थित होते.