*हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 28 आणि 29 जानेवारीला बेंगळुरू येथे हिन्दू राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन !*
100 पेक्षा अधिक हिंदु संघटनांचे 500 पेक्षा अधिक हिंदु प्रतिनिधी सहभागी होणार !
*बेंगळुरू*: हिंदु जनजागृती समिती हिंदू राष्ट्र जागृती, हिंदू संघटनासाठी 28 आणि 29 जानेवारीला बसवेश्वर नगर बेंगळुरू येथील गंगम्मा तिम्मय्या कन्व्हेयन्स सेंटर येथे राज्यस्तरीय हिंदू राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करत आहे. यात राज्याच्या सर्व जिल्ह्यातून 100 पेक्षा अधिक हिंदु संघटनांचे 500पेक्षा अधिक प्रतिनिधी अधिवेशनात सहभागी होणार आहेत.
या हिंदू राष्ट्र अधिवेशनात लव्ह जिहाद, हलाल जिहाद, लँड जिहाद, हिंदु कार्यकर्त्यांची हत्या, इतिहासाचे विकृतीकरण, हिंदु धर्म, परंपरांवर आघात, हिंदु देवस्थानांचे सरकारीकरण, गोरक्षण इत्यादी हिंदु समाजावर आघात करणाऱ्या विविध विषयांवर चर्चा होणार आहे. सध्याच्या काळात हिंदु समाजाला सामोरे जावे लागणाऱ्या समस्या यावरील उपाय म्हणून करावयाची हिंदु जागृती, हिंदु संघटन, हिंदु आंदोलने याविषयी कार्य योजना रचण्यात येईल. 50 पेक्षा अधिक ज्येष्ठ हिंदु अधीवक्ते, व्यावसायिक, चिंतक, लेखक, देवालयांचे विश्वस्थ आणि समविचारी सामाजिक, राष्ट्रवादी संस्था आणि आध्यात्मिक संस्थांचे असे 500पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. अधिवेशनाच्या नोंदणीसाठी 7204082609 या क्रमांकावर संपर्क करावा अशी माहिती समितीचे राज्य प्रवाक्ता श्री. मोहन गौडा यांनी दिली आहे.
या हिंदू राष्ट्र अधिवेशनात प्रामुख्याने युवा ब्रिगेडचे श्री. चक्रवर्ती सुलिबेले, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, डॉ. एस. आर. लीला, इतिहासकार आणि लेखक श्री. संदीप बालकृष्णन, रंगायनचे निर्देशक श्री. अड्डड कऱ्याप्पा, सिनेमा निर्देशक श्री. प्रकाश बेळवडी, अधिवक्ता श्री. किरण बेट्टादपुर यांच्यासह 30 पेक्षा अधिक गणमान्य व्यक्ती विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी अधिवक्ता अमृतेश एन.पी., अधिवक्ता कृष्णस्वामी, हिंदवी झटका मीट संस्थापक श्री. मुनेगौडा हे उपस्थित होते.