देशाला समृद्ध बनविण्यासाठी संविधानाचे पालन आवश्यक -डॉ.डी.एम.मुल्ला
बेळगाव वडगांव विष्णू गल्लीतील निजामिया बैतूलमाल आणि वेलफेर ट्रस्ट तर्फे भारतीय गणराज्योत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. यावेळी मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.डी.एम. मुल्ला हे प्रमुख अतिथीपदी उपस्थित होते. तर समारंभाच्या अध्यक्षस्थानी वडगांव निजामिया जामिया सुन्नत जमातचे अध्यक्ष सलीम सय्यद होते. सलीम सय्यद आणि प्रमुख अतिथी डॉ. डी. एम. मुल्ला यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले.
प्रमुख अतिथी पदावरून बोलताना डॉ.डी.एम. मुल्ला म्हणाले की भारतीय संविधान हा जगातील सर्वात सुंदर असा संविधान आहे.भारताला जगात सुंदर, सुदृढ ,प्रगतिशील आणि बलिष्ठ देश म्हणून प्रतिष्ठित करण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी संविधानात दिलेल्या तत्त्वांचा जीवनात अनुकरण करणे आवश्यक आहे.संविधानात्मक तत्वामुळे देशात शांती, सलोखा आणि एकात्मता टिकून आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मौलाना अहमद नदाफ यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. उर्दू शाळेच्या मुलीने सुंदर देशभक्ती गीते प्रस्तुत केली. या समारंभाला निजामिया बैतूलमाल आणि वेलफेर ट्रस्टचे अध्यक्ष आसिफ जकाती, जावेद सय्यद, अशरफ मदरंगी,समीर सुतार,मलीक इप्पेरी, मुस्ताक दड्डी,मंझूर तिगडी,इमामहुसेन नालबंद, इरफानपाशा, सलमान दंडावत,रफिल जमादार,शहबाज तहसिलदार आदि सदस्य उपस्थित होते.