This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

विश्व हिंदू परिषद बजरंग दल संघटने मध्ये तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विश्व हिंदू परिषद बजरंग दल संघटने मध्ये तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा

 

विश्व हिंदू परिषद बजरंग दल शाखा स्थापन करण्याकरिता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोडणी येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर मध्ये ही बैठक संपन्न झाली.

 

 

यावेळी या बैठकीस मार्गदर्शक म्हणून विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष प. पू प्राणलिंग स्वामीजी उपस्थित होते यावेळी त्यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले.

 

 

यावेळी त्यांनी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनेची स्थापना करण्याची गरज का निर्माण झाली याबद्दल माहिती दिली त्याचबरोबर देशातील धर्मांतर पाश्चात संस्कृतीचे अनुकरण मोबाईलचा अतिरेक धर्म रक्षणासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी उचललेली पावले याबद्दल सविस्तर माहिती दिली.

 

 

त्यानंतर कोडणी येथील गावात महिन्यातून एकदा मंदिर स्वच्छता उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले तसेच समाज हिताचे उपक्रम राबविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला याप्रसंगी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

त्यानंतर त्यांनी निपाणी परिसरातील तरुणांनी या संघटनेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन धर्माने कार्यरत रक्षणाच्या कार्यात कृतिशील सहभागी व्हावे असे आवाहन याप्रसंगी केले

 

 

 

यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोडणी येथील बजरंग दलचे युवराज जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण चव्हाण यांनी केले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now