बेळगाव सीमाभाग शिवसेनेत मोठा भूकंप
*सिमाभाग बेळगावात शिवसेने होणार मोठा भूकंप ; शिव सेनेचे होणारी बदनामी मुळे तालुका प्रमुख सह , पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्ष सोडण्याचा निर्णय*
_*शिवसेनेत नव खलबत ! पक्ष बदनामी शडयंत्र ला कंटाळून पक्ष सोडतोय ; पण मरेपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा सैनिक राहिल!’, वरिष्ठ पदाधिकारींच्या बेजबाबदार कामाना कंटाळून सर्व पदाधिकारी शिवसेनेला अखेरचा ‘ जय महाराष्ट्र’ करणार* ?_
: बेळगाव जिल्हा शिवसेनेची होणारी बदनामीला कंटाळून शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले, उपतालुका प्रमुख पिराजी शिंदे , उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, उपशहर प्रमुख प्रकाश राऊत यांनी शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ निर्णय घेण्याचा तयारीत आहे. शिवसेना सोडत असलो तरी आम्ही कुठल्याही पक्षात जाणार नसून मरेपर्यंत उद्धव बाळासाहेबांचा सैनिक म्हणून अपक्ष काम करत राहणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
बेळगाव ( सिमाभाग ) शिव सेना वरिष्ठ पदाधिकारी मुळे शिवसेना डासळलेली आहे. स्वता म्हणजे पक्ष असे कार्य गरजेचे असताना पक्षाची इतकी वारणवार होणारी बदनामीला नाराज होऊन त्यांनी सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र ठोकणार असल्याची तयारी चालू केली आहे. ४ ते ५ दिवसांत हा निर्णय घेणार आहेत.
तालुका प्रमुख सचिन गोरले यांनी त्यांच्या समर्थ निवासस्थानी बुधवारी (ता.२५) आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची माहिती दिली. माझे सोबत उपतालुका प्रमुख पिराजी शिंदे, शहर उपशहर प्रमुख प्रकाश राऊत, राजू तुडयेकर, सह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते राजिनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली.
बेळगाव जिल्ह्या परिसरात सचिन गोरले यांनी शिवसैनिक म्हणून कारकीर्द गाजवली आहेत. त्यानंतर तालुका प्रमुख पदी काम करत बेळगाव तालुका व खानापूर तालुका भागात पक्ष (संघटना ) बळ्कट देण्याचे काम केले आहे. अशी त्यांची यशस्वी कारकीर्द राहिली. सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व पक्षाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार त्यांनी विविध आंदोलने, सभा, निवडणुका मध्ये सहभाग कायम राहिलेला आहे.
सद्या संघटना बळकट ला वाव देण्याचे कार्य होत नाही. शिवाय आपल्याच माणसाकडून पक्ष बदनाम होत आहे. तरी देखील त्यांची कोणतीच हालचाली नाही. मी म्हणजे शिवसेना असा भ्रम असलेल्या नेत्यांनी कडून पदाधिकाऱ्यांना पक्षात सन्मानाची वागणूक दिली जात नाही. शिवाय पक्ष स्वतंत्र ताकदीने निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रयत्न ही केले जात नाही. वर्षानू वर्ष हिच परंपरा म्हणून मिरवणाऱ्या या पक्षातील नेत्यांनी आता थांबन्याची गरज आहे. अशी खंत ही पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली.
*मराठी भाषा मराठी अस्मिता म्हणजेच फक्त शिव सेना*