राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखा
26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात.मात्र हीच राष्ट्रध्वज त्याची रस्त्यावर कचरापेटी आणि गटारीत फाटलेल्या अवस्थेत आढळतात. तसेच प्लास्टिकचे लगेच नष्ट न झाल्याने या राष्ट्रध्वजाची विटंबना अनेक दिवस पहावे लागते त्यामुळे ही राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्याकरिता हिंदू जनजागृती समितीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी प्लास्टिकच्या ध्वजाची विक्री करणे हे कायदा विरोधी असून त्याला मान्यता देऊ नये अशी मागणी केली आहे.
हिंदू जनजागृती समितीने प्लास्टिकचा ध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला शासनाला निवेदन दिले आहे. त्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की दुकान तसेच ऑनलाईन पद्धतीने तिरंगा च्या रंगातील मास्क विक्री सुद्धा होत असल्याचे दिसून आले आहे. तिरंग्याचा मास्क वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही. त्यामुळे अशा मास्कवर बंदी आणावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी त्यांनी असे देखील म्हटले की देशाच्या स्वातंत्र्यलयात सहभागी देशभक्तांना इंग्रजीच्या अत्याचार चालू असताना हातातील राष्ट्रध्वज जमिनीवर पडू दिला नाही.तसेच त्यांना यावेळी लाटा काट्या अत्याचार सहन करावे लागले.तसेच अनेकांनी आपल्या प्राण्याचे बलिदान ही दिले त्यामुळे राष्ट्रध्वजासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारांचा एक प्रकार या द्वारे अवमानच होत असल्याचे देखील नमूद केले आहे त्यामुळे आपला हा राष्ट्रध्वज उंचाने आकाशातच फडकावा. तो जमिनीवर नसावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाऱ्या शाळेतील रांगोळी स्पर्धा त्यामध्ये काढण्यात येणारे ध्वज त्याचाही अवमान होत असल्याने शाळेमध्ये सुद्धा घेण्यात येणाऱ्या अशा स्पर्धांवर बंदी आणावी अशी मागणी यावेळी केली.