*जोती गवी फाउंडेशन तर्फे प्रा. मायाप्पा पाटील यांचे महिला सक्षमीकरणवर काकतीत व्याख्यान*
*
_________
बेळगाव तारीख ( 22 ), : काकती तालुका बेळगाव येथे माजी ग्रामपंचायत अध्यक्षा व समाजसेविका ज्योति गवी फाउंडेशनच्या वतीने सोमवार दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता प्रबोधनात्मक व्याख्यानाचे शिबिर आणि तिळगुळ समारंभ कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी राणी पार्वतीदेवी पदवी महाविद्यालयाचे प्राध्यापक मायाप्पा पाटील यांचे “” *महिला सक्षमीकरण आणि आजच्या काळातील स्त्री : जिजामातांचा आदर्श एक चिंतन* “” या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. फाउंडेशनच्या अध्यक्षा समाजसेविका ज्योती गवी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि व्याख्यानाचा मोठया प्रमाणात लाभ घ्यावा असे पंचक्रोशीतील नागरिकांना महिलांना आवाहन करण्यात आलेले आहे.
ज्योती घरी फाउंडेशन तर्फे वेगळे उपक्रम राबवून प्रत्येक क्षेत्रातील नव देताना त्याचे व्यासपीठ देण्याचे कार्य करत आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवून त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्याकरिता देण्यासाठी अशा नवनवीन उपक्रमातून चालणार देणारे हे फाउंडेशन आहे.
मानवी हक्कांविषयी अनेक आंतरराष्ट्रीय करारांत मान्यता मिळूनही, स्त्रिया निर्धन आणि निरक्षर राहण्याचे प्रमाण मोठे आहे. वैद्यकीय सुविधा, मालमत्तेची मालकी, पतपुरवठा, प्रशिक्षण आणि रोजगारात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कमी संधी मिळते. त्या पुरुषांच्या तुलनेत राजकीयदृष्ट्या सक्रिय असण्याची शक्यता फारच कमी आहे, आणि त्या घरगुती हिंसाचाराचा बळी होण्याची शक्यता खूपच मोठी आहे. स्त्रियांची मानसिकता बदलणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागात स्त्रिया अजूनही स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत. तेथे त्या पुरुषांच्या निर्णयावर अवलंबून राहतात. त्यांची निर्णय क्षमता वाढणे गरजेचे आहे. घटनेने अनेक अधिकार दिलेले आहेत, याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचली पाहिजे, प्रबोधन झाले पाहिजे. स्त्री अजूनही १००% सक्षम आहे हे आपण मान्य करू शकत नाही. त्यासाठी महिलांना हक्कांचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हा ज्योती फाउंडेशन तर्फे नवोदित प्रयत्न आम्ही करत आहोत.
_—————