डोन्ट अंडरस्ट्रीमेट द पावर ऑफ कॉमन मॅन
नागरिकांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाले आहे . सध्या त्यांच्यामध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने सर्वजण आपणच निवडून यावे याकरिता रस्सीखेच खेळ खेळत आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या गोष्टींचे आमिष दाखवून त्यांना आपल्या बाजूने करून घेत आहेत. मात्र हे सर्व करत असताना त्यांच्याकडून विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष झाले आहे.
ग्रामीण भागात बस सुविधेचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना लटकळत प्रवास करावा लागत आहे. तसेच शिक्षण घेण्यासाठी तासनतास बस थांब्यावर थांबून बसची वाट पहावी लागत आहे
जर बस सुरळीत असतील तर विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीस्कर होईल. आणि त्यांच्या शिक्षणाकरिता लोबकळत प्रवास करणे थांबले. अहो तुम्हाला विकासच करायचा आहे ना तर मग अपुऱ्या सुविधेचा तुम्ही विकास करा. नागरिकांना आमिषे दाखवून तुम्ही एखाद्या वेळेस निवडून याल मात्र विद्यार्थ्यांचे भवितव्य काय.
अनेक मतदारसंघात निवडून येण्याकरिता तुम्ही अमिष दाखवून जी गोष्टी वितरित करत आहात ते करण्याऐवजी तुम्ही ग्रामीण भागातील बस सुविधा सोडविण्यास प्राधान्य द्या.
मतदारांच्या मुलांचे भवितव्य याद्वारे तुम्ही सुरक्षित करा, परिवहन मंडळाला जादा बसेस सोडण्याची मागणी करा. नाकी अनेकांना कुकर मिक्सर भांडी फ्रिज देऊन त्यांना अमिष दाखवू नका.
सध्या मतदार राजा हुशार झाला आहे . आपले हित कशात आहे त्याला चांगलेच समजते. तुम्ही जसा त्यांचा निवडणुकीपुरता उपयोग करून घेता तसा तेही उपयोग करून घेणारच.
आणि आपल्या गावाचा जर विकास चांगला व्हायचा असेल तर ते योग्य उमेदवाराला निवडून देणारच हे निश्चित आहे. त्यामुळे मतदारांनो आताच तुम्ही जागे व्हा आणि या लोकप्रतिनिधींना चांगले च खडसावून सांगा की आम्ही तुमच्यामुळे नाही तर तुम्ही आमच्यामुळे राज्य करत आहात.
जर सर्व प्रजा एकत्र झाली तर राजा देखील काही करू शकत नाही.त्यामुळे राजाने वेळीच हुशार होणे गरजेचे आहे.फक्त आपल्या स्वार्थापुरती नाही तर विकासासाठी त्यांनी शहाणे होणे गरजेचे आहे.
त्यामुळे सध्या आमिषे दाखविण्या ऐवजी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे जे हाल होत आहेत या समस्येकडे लक्ष द्या. महिलांच्या अनेक समस्या सोडवा, गावामध्ये रस्ते तयार करा ज्या गावाला पाणी नाही त्या ठिकाणी बोरवेल विहीर त्याची सोय करून द्या.
ह्या सर्व सुविधा जर तुम्ही उपलब्ध करून दिला तरच ही प्रजा येणाऱ्या निवडणूक घेत तुम्ही केलेल्या कामाचा मोबदला तुम्हाला देईल आणि विजयी करून आणेल. त्यामुळेडोन्ट अंडरस्ट्रीमेट द पावर ऑफ कॉमन मॅन असे आता मतदार बोलत आहेत.