गोळीबार प्रकरणी सखोल चौकशी करा :अन्यथा तीव्र आंदोलन छेडू
रवी कोकितकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या झालेल्या हल्ल्यात ते जखमी झाले. त्यामुळे त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी हिंदू संघटनेचे नेते करत आहेत. जर त्यांच्यावर हल्ला केलेल्या आरोपींना अटक करण्यात आली नाही तर उग्र आंदोलन छेडू असा इशारा श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी पत्रकार परिषदेत देखील दिला आहे.
आज शहरात बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.तसेच त्यांनी महिन्याच्या आत खऱ्या आरोपींवर कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे.
श्रीराम सेनेच्या विराट हिंदू मेळाव्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी रवी कोकितकर यांच्या वर गोळीबार करण्यात आला ते कारमधून जात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यामध्ये ते सुदैवाने बचावले.
हा त्यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्व वैमान्यातून झाला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र मेळाव्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी सायंकाळी हिंदू हल्लेखोरांनाच पुढे करून हिंदू विरोधी शक्तींनी हा कट रचला असल्याचा आरोप केला. तसेच तपासाचे नावाने दिशाभूल करत असल्याचे देखील यावेळी सांगितले.
त्यामुळे रवी कोकितकर यांच्यावर हल्ला केलेल्या आरोपींना अटक करावी अशी मागणी त्यांनी केली.जर रवी कोकितकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांना जर गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला असता तर त्याला कोण जबाबदार राहिले असते असा प्रश्न प्रमोद मुतालिक यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
जर पोलिसांनी खऱ्या आरोपींना लवकरात लवकर गजाआड केले नाही तर आपण या संदर्भात गृहमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी झालेल्या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकला आणि आपले म्हणणे पत्रकारांसमोर मांडले . याप्रसंगी वकील देखील उपस्थित होते.