शॉर्टसर्किटमुळे वीज केंद्रात भीषण आग
अथणी शहराजवळल विजापूर रोडला जोडलेल्या वीज केंद्रात आज सकाळी शॉर्टसर्किट लागल्याने भीषण आग लागली. ही घटना सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
अथणी येथील 110 केवी 20 केंद्रात ही भीषण आग लागल्याने आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात परिसरात पसरले. तसेच संपूर्ण वीज केंद्राला आगीने वेधले होते.
यावेळी वीज केंद्रातच आग लागल्याने लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले. तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी नागरिकांनी याची माहिती अग्निशमन दलाला देताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी आग विझवण्याकरिता शर्तीचे प्रयत्न सुरू केले.
या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. तसेच ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली तर अन्य कोणते कारण आहे याचा शोध घेण्यात येत आहे.