कार चोरी प्रकरणाचा लावला छडा
बेळगाव पोलिसांनी कार चोरी प्रकरणाचा छडा लावला असून कार चोराला जेरबंद करण्यात हुक्केरी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी एक मोटारसायकलही जप्त केली आहे.
याबाबत माहिती अशी की जुलै 2022 मध्ये हुक्केरी तालुक्याच्या हंजियानट्टी गावच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या टोयोटा कंपनीच्या इटिओस ‘अवा’च्या चोरी प्रकरणातील आरोपींचा पाठलाग करणाऱ्या हुक्केरी पोलिसांना ही कार ताब्यात घेण्यात यश आले.
या प्रकरणातील मुख्य आरोपी हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील औरंगाबादचा रहिवासी असून तो गडहिंग्लज एमएसआरटीसीमध्ये लिपिक म्हणून कार्यरत होता. नंतर नोकरी गमावलेल्या आरोपीने सेकंड हँड कार घेण्याचा धंदा सुरू केला,
त्यानंतर त्याने कार मीच चालवत असल्याचे सांगून इतर लोकांची वाहने मिळवली, वाहनांचे नंबर बदलले, बनावट कागदपत्रे तयार केली, इतरांना विकून पैसे गोळा केले. त्यांच्याकडून गाडीत बसवलेल्या GPS वरून त्याने गाडीचे लोकेशन शोधून काढले व तो पूर्वी काम करत असलेल्या गडहिंग्लज तालुक्यात आपल्या ओळखीच्या तीन जणांना गाडीचे लोकेशन सांगून त्यांच्याकडील वाहन चोरून नेले.
तेच वाहन पुन्हा दुसऱ्याला विकून फसवणूक केली. हुक्केरी पोलिस स्टेशनचे पीआय मोहम्मद रफीका तहसीलदार यांच्या पथकाने महाराष्ट्राच्या शेजारील राज्यातील गडहिंग्लज, कोल्हापूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि पंढरपुर येथे कारवाई केली आणि आरोपीला गजाआड केले .