विवेकानंदांचे विचार जीवनासाठी प्रेरणादायक -डॉ.गिरजाशंकर माने
बेळगांव
येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात रेड क्रास, आयक्यूएसी आणि एन.एस.एस.घटका तर्फे
स्वामी विवेकानंद जयंती ‘राष्ट्रीय युवा दिवस’ म्हणून साजरी करण्यात आली. या समारंभाला बेळगांव संगोळी रायन्ना सरकारी पदवी महाविद्यालयाचे इंग्रजीचे प्राध्यापक डॉ. गिरजाशंकर माने हे प्रमुख अतिथी आणि वक्ता म्हणून उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर होते.
कार्यक्रमाची सुरुवात बी.कॉम.अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींच्या ईशस्तवनाने झाली, तद्नंतर रेड क्रास संयोजक प्रा.गिरीश कर्की यांनी प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत केले. स्वामी विवेकानंदांच्या फोटो पुजनानंतर प्रमुख वक्ता म्हणून बोलताना डॉ. गिरीजाशंकर माने म्हणाले की, विवेकानंदांचे विचार जीवन जगण्यासाठी प्रेरणादायक आहेत. माणसांमध्ये मनुष्यत्व आणण्याचे विचार विवेकानंदांचे होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या समोर डॉ. गिरिजाशंकर माने यांनी विवेकानंदांच्या जीवन-चरित्रावर प्रकाश टाकला.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर म्हणाले विद्यार्थ्यांनी आपले उत्तम व्यक्तीत्व बनविण्यासाठी संत,महात्मा व्यक्तिंचे विचार जीवनात अनुकरण करणे आवश्यक आहे.विवेकानंदांचे उपदेशात्मक विचार आम्हा सर्वाना युवाशक्ती प्रदान करतात. विवेकानंदांच्या मुळेच भारतीयतेची ओळख जगाला झाली.
कार्यक्रमाच्या शेवटी नँक समन्वय अधिकारी प्रा.आर.एम.तेली यांनी सर्वांचे आभार मानले. वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एच.जे.मोळेराखी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या समारंभाला प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
D Media 24 > Local News > विवेकानंदांचे विचार जीवनासाठी प्रेरणादायक -डॉ.गिरजाशंकर माने
विवेकानंदांचे विचार जीवनासाठी प्रेरणादायक -डॉ.गिरजाशंकर माने
D Media 2414/01/2023
posted on
Leave a reply