हॉटेल मॅनेजमेंटच्या वर आधारित प्रात्यक्षिक सादर
गोंधळी गल्ली येथील आपटेक एव्हिएशन अँड हॉस्पिटल मध्ये विद्यार्थ्यांनी हॉटेल मॅनेजमेंटच्या वर आधारित प्रात्यक्षिक बनवले होते.
यावेळी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाकरिता सोयीस्कर व्हावे याकरिता त्यांनी येथील अपटेक अँड एव्हीएशन मध्ये हॉटेलच्या प्रतिकृती साकारल्या होत्या.
यावेळी त्यांनी वेगवेगळे हॉटेल्स चे प्रोजेक्ट बनवले असून यामध्ये किचन हॉटेल मॅनेजमेंट स्टाफ लॉन्ड्री यासह अनेक गोष्टी कशाप्रकारे हॉटेलमध्ये असतात याची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दिली.
याप्रसंगी फियर फाईल्ड मेरिट हॉटेलचे ऑपरेशन मॅनेजर चिनू यांनी विद्यार्थ्यांनी केलेले हॉस्पिटलिटी अँड मॅनेजमेंट प्रोजेक्ट बद्दल त्यांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे प्रोजेक्ट यशस्वी करण्याकरिता संचालक विनोद बामणे यांचे सहकार्य लाभले.