बस स्थानकावर मराठीला स्थान द्या : म. ए. युवा समिती ची परिवहन मंडळाला निवेदन
बेळगावच्या केंद्रीय बस स्थानकाचे अलीकडेच नूतनीकरण करण्यात आले आहे आणि लवकरच त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. सदर बस स्थानकांवर मराठीला स्थान न दिल्याने सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये नाराजी पसरली आहे. तसेच बेळगाव बस स्थानकावर दररोज महाराष्ट्र-गोवा येथून अनेक प्रवाशी प्रवास करत असतात त्यांना कानडी भाषा समजत नाही त्यामुळे प्रवाशांना बस शोधण्यात अडचणीचा सामना करावा लागतो.
बेळगाव जिल्ह्यात मराठी भाषिक हे बहुसंख्य असून त्याना त्यांच्या भाषेत सर्व सोयी सुविधा दिल्या जाव्यात असे निर्देश बेळगावच्या प्रशासनाला २०१४ मध्ये कर्नाटकच्या उच्च न्यायालयाने दिले आहेत, व भाषिक अल्पसंख्याक आयोगाने देखील या संबंधित वेळोवेळी कर्नाटकाला सूचना दिल्या आहेत तरी देखील त्या सुचनांकडे जाणूनबुजून कानाडोळा कर्नाटकचे प्रशासन करीत आहे.
आज महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावच्या वतीने बेळगावच्या वायव्य परिवहन मंडळ कार्यालयाला बेळगावच्या केंद्रीय बस स्थानकाच्या नुतन इमारतीवर मराठी भाषेला स्थान द्यावे तसेच प्लॅटफॉर्मवर आणि बसेस वर इतर भाषांसोबत मराठीला देखील स्थान देण्यात यावे अश्या आशयाचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी परिवहन मंडळाचे मुख्य नियंत्रक अधिकारी श्री पी. व्हाय. नाईक यांनी या संबधीत वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविला जाईल अशी माहिती युवा समिती च्या शिष्ठमंडळाला दिली
यावेळी युवा समिती चे उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, कार्याध्यक्ष सुरज कुडुचकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, वासू सामजी, नागेश बोबाटे, विनायक कावळे, संभाजी शिंदे, शिवराज चव्हाण, राजू कदम, प्रवीण रेडेकर, आनंद पाटील, सुधीर शिरोळे, सिद्दार्थ चौगुले, ओमकार चौगुले, मारुती बेडका, प्रथमेश मण्णूरकर, प्रतीक पाटील आणि संतोष कृष्णाचे आदी उपस्थित होते